सदर फोटोमध्ये साचलेले जे पाणी दिसत असून ते आजच्या पावसाचे नाही तर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माळ बंगला येतील वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधील वॉश आऊट केलेले पाणी जुना बुधगाव रस्ता जय अंबे धाबा परिसरातील असून
याबाबत स्थानिक नागरिक आणि आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा महानगरपालिकेत कडून कोणतीही उपाय योजना आतापर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान व हाल होत आहे.
मा. आयुक्त साहेबांना विनंती आहे आपण याबाबत लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.