आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
गोंदवले: कुकुडवाड, ता. माण या ठिकाणी २०१८ मध्ये घटस्फोटाच्या कारणावरून सासूचा खून करणाऱ्या आबासो बबन काटकर वय ४२ वर्षे रा. नरवणे येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वडूज न्यायाधीश आर. व्ही. हद्दारसो यांनी भा.द.वि.स. कलम ३०२ अन्वे जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद तसेच भा.द.वि.स. कलम ३२४ अन्वये ३ वर्ष सक्तमजुरी, कलम ३२३ अन्वये ६ महिने सक्तमजुरी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस यांनी तपास कामी मदत केली.
याबाबत थोडक्यात हाकिकत अशी की, २०१८ साली सायंकाळी ५ च्या सुमारास शिवाजीनगर कुकुडवाड येथील मयत रंजना हनुमंत भोसले यांच्या राहत्या घरासमोर आरोपी आबासो बबन काटकर हे त्या ठिकाणी येऊन नणंद वैशाली यांना घटस्फोट देण्याच्या कारणावरून सासू रंजना हीस शिवीगाळ दमदाटी केली तसेच तिच्या छातीवर, कपाळावर, हातावर, चाकूने वार करून जीवे ठार मारले व चाकू त्या ठिकाणी टाकून पळून गेला. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात
आला होता. सदर गुन्ह्यात सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदाराचे जाबजबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले. सदर कामी पोलीस हवालदार एस. एस. सानप यांनी मदत करून कसून तपास करत आरोपी विरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वडूज येथे दोषआरोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाच्यावतीने ११ साक्षीदार तपासण्यात आले तसेच साक्षीदाराचे जाबजबाब, कागदपत्रे, पुरावा वैद्यकीय पुरावा व सरकारी वकीलचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा देण्यात आली आहे. या कमी जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम केले.
सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस, पो लीस कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, सागर सजगणे, जयवंत शिदे यांनी सहकार्य केले.