जाहीर निषेध
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
गेले एक महिना श्रीराम मंदिर चौक मध्ये मोठा
खड्डा पडला आहे. कालच्या पावसामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यामुळे बरेच नागरिक खड्ड्यांमध्ये पडले. बहुधा पोहायला शिकत असावेत बिचारे...त्यात मनपाचा काय दोष?
ह्या त्रासाला कंटाळून राम मंदिर रिक्षा स्टॉप वरील रिक्षा चालक अनिल दळवी यांनी आज विडंबनात्मक आंदोलन केले.
यावरून तरी महापालिकेला जाग येते का बघूया...
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा