आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
दहिवडी: मलवडी, ता. माण येथील दीपक मसुगडे चोरी, रॉबरी, खुनाचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत माजवणारा टोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या टीमने दीपकसह साथीदारांना गजाआड केले.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेलसमोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमूव्हर्स, रा. सत्रेवाडी, हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकलवरून येऊन सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे, सुरज दहिवडा पोलीस ठाण
सराईत गुन्हेगार दीपक मसुगडेसह साथीदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व टीम
कैलास जाधव, महेश आप्पासो जाधव सर्व रा. नवलेवाडी यांनी फिर्यादीस लाथा बुख्यांनी मारहाण करून त्याच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट बळजबरीने काढून घेऊन मोटरसायकलवरून निघून गेले. याबाबत तक्रारदाराने दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हातील आरोपीचा मलवडी परिसरामध्ये शोध घेऊन ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली.
हो कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार, गुलाब दोलताडे, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ नरभट, महेंद्र खाडे, निलेश कुदळे, गणेश खाडे यांनी कारवाई केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे करीत आहेत.