मार्डी गावचे सुपुत्र माधव राऊत यांना महाराष्ट्र आयकॉनिक अवॉर्ड 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 13/06/2025 4:34 PM

..


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

स्काय इंटरनॅशनल टुरिझम व राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण सातारा आयोजित महाराष्ट्र कर्मयोगी परिषद कराड 2025 यांच्या वतीने हा पुरस्कार 


सातारा दि.रोजी वेणुताई चव्हाण सभागृह कराड येथे देण्यात आला. गौरव योगदानाचा गौरव कर्तुत्वाचा गौरव एकतेचा गौरव आपल्या समाजसेवेचा सामाजिक कार्य निस्वार्थ सेवेबद्दल माधव राऊत यांना या वर्षात मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. एक विशेष आणि वेगळेपण म्हणजे हा पुरस्कार आपल्या कर्मभूमीत मायभूमीत आपल्या सातारा जिल्ह्यात मिळत आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे. तसेच आपल्या कर्मभूमीत मायभूमीत कोणीतरी आपल्या सामाजिक कार्याची दखल घेतली त्याबद्दल या संस्थेचे हार्दिक आभार तसेच त्यांनी आमच्यासारख्या सामान्य सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद व पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे सामाजिक बांधिलकीची जबाबदारी अजून वाढलेली आहे. शेवटी पुरस्कारासाठी काम करण्यापेक्षा सामाजिक काम करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उक्तीप्रमाणे काम करत राहणे शेवटी समाज उपयोगी कामे केल्यामुळे त्याचे एक मानसिक समाधान आपल्या चेहऱ्यावर उमटते. हा पुरस्कार त्यांना सुप्रसिद्ध अभिनेता ध्रुव दातार ( लक्ष्मीची पावले मालिकेतील राहुलची भूमिका ), बी एन खरात, ग्रामसेवक सतीश भोसले, देवानंद कांबळे तक्षशील सामाजिक संघटना राष्ट्रीय सचिव, इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. त्यांचे मा.शेखरभाऊ गोरे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा,मा. संदीपदादा पोळ,मा. सूर्यकांत गवळी मुंबई नगरसेवक,मा. सुरेखाताई पखाले नगरसेविका दहिवडी,मा. शंकरराव गायकवाड नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, बापूराव चव्हाण, राहुल सावंत, संजय राऊत, बाळासाहेब राऊत, हनुमंत चव्हाण, चंदू पोळ, योगेश पोळ, इत्यादींनी अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या