मोकळ्या जागामधील वाढलेल्या झुडपांसह डासांच्या प्रादुर्भावाबाबत त्वरीत उपाययोजना करावी : लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/06/2025 3:41 PM


 सांगली प्रतिनिधी 
     सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक मोकळे प्लॉट आहेत शिवाय महापालिका क्षेत्रात अनेक विस्तारित भाग असून या ठिकाणी सोयी सुविधा म्हणाव्या तितक्या नसल्याने या ठिकाणच्या मोकळ्या प्लॉटमध्ये सध्या पावसामुळे पाणी साठून राहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे व गवत वाढले आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अतिशय वेगाने वाढले आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झाला आहे.
    या ओपन प्लॉट्समध्ये विषारी सापांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचीही वाढ झाली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शामराव नगर परिसरात ही समस्या अधिक गंभीर असून स्थानिक रहिवाशांचे आरोग्य व जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर सर्व ओपन प्लॉट्सची महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत पाहणी करावी. संबंधित प्लॉट मालकांना तातडीने नोटीस देऊन त्यांच्याकडून प्लॉट स्वच्छ करून घ्यावा व योग्य भराव टाकण्याचे निर्देश द्यावेत.महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी कीटकनाशक फवारणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात यावा. अशी मागणीच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
           लवकरात लवकर ही समस्या दूर करावी अन्यथा नागरिकांना घेऊन महापालिका समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या