भगुर येथील स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. असे भगूर येथील मनसेचे सामाजिक कार्यकर्त्यांनी भगूर नगरपालिकेस निवेदनाद्वारे इशारा दिला आहे
भगूर येथील स्मशान भूमीच्या अवस्था अत्यंत वाईट आहे. या स्मशानभूमीत अनेक समस्याl आहेत, जसे की स्वच्छतागृहांमधील गैरसोय, कचऱ्याची विल्हेवाट, तसेच शेड गळणे आणि इतर काही मूलभूत सुविधांचा अभाव. यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसचे
स्मशानभूमीत पाऊस पडल्यास बसण्याची जागा पाण्याने साचते ज्यामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांची गैरसोय होते.
या समस्यांमुळे स्मशानभूमीची स्वच्छता आणि सोयीसुविधा यांमध्ये मोठी कमतरता आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्यासाठी, खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे:
स्वच्छता:
स्मशानभूमीत नियमितपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थित विल्हेवाट लावावा आणि स्वच्छतागृह व पाण्याची सोय असावी.
सुविधा:
स्मशानभूमीत मूलभूत सुविधा, जसे की बसण्याची जागा, शेड आणि लाईट या सुविधा उपलब्ध असाव्यात.
दुरुस्ती:
स्मशानभूमीत जी काही दुरुस्ती करायची आहे, ती तातडीने पूर्ण करावी. गळणाऱ्या शेडची दुरुस्ती करावी, तसेच अन्य आवश्यक दुरुतीही करावी.
व्यवस्थापन:
स्मशानभूमीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
जागरूकता:
स्मशानभूमीच्या देखभालीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
स्मशानभूमीची व्यवस्था सुधारल्यास, लोकांना अंत्यसंस्कार व्यवस्थित करता येतील आणि स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर दिसेल यासाठी प्रयत्न करावे. असे त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे भगूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी श्री पटेल यांना सांगितले
यासर्व समस्या लवकरात लवकर भगुर नगर पालिकेने सोडवाव्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष श्री.सुमित चव्हाण व मनसे शहर उपअध्यक्ष श्री श्याम देशमुख, भाजप उपाध्यक्ष निलेश हासे शिवसेना शिंदे गटाचे सुनिल जोरे यांनी दिला..
यावेळी राजेश गायकवाड, प्रवीण वाघ, संदीप बागडे,हरीश देशमुख, मयुर चव्हाण, वैभव गायकवाड, अभिषेक चव्हाण, स्वप्निल देशमुख, सोनू देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.