विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस श. प. पक्षाची नजर : डॉ शुभम जाधव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/06/2025 3:45 PM

सांगली: सध्या प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक ,पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रकिया सुरू आहे.

सदर प्रवेश संदर्भात विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्यांबाबत  सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कटीबद्ध असल्याचे विद्यार्थी संघटनेचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की , पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब, सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब ,युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या सूचनेनुसार कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रवेश प्रकियेमध्ये कोणत्याही महाविद्यालयात कोणतीही समस्या असेल किंवा कोणतीही शाळा व महाविद्यालय रीतसर शुल्क व्यतिरिक्त जास्त शुल्क आकारात असेल तर आम्हाला ८८ ५५ ९२२ ९२२ या नंबर वर संपर्क करावा.
आमची विद्यार्थी संघटना सदैव विद्यार्थी हिता साठी आपल्या सोबत असेल.

  यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव ,शुभम ठोंबरे ,जयकुमार पांढरे  ,तेजस पाटील, व्रजेश पडियार, समर्थ आरगे, अनिकेत भंडारे, साद राहिमतपुते, व सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या