साचणारे पाणी निचरा करण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्याची गरज : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/06/2025 12:06 PM

सांगली म्हणजे पूर्वीचे सहा गल्ली ची सांगली... म्हणजे जुनी सांगली गावठाणातील सांगली 
शामराव नगरच्या मार्गावर...
गाव भाग ठाणेकर हॉस्पिटल परिसरात सिटीस्कूलच्या मागील बाजूपासून सहा सात गल्ल्यांचे पाणी सदर ठिकाणी येते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच मनपा निविदा समितीच्या आशीर्वादाने चुकीच्या पद्धतीने गटारीचे काम झाल्यामुळे सदर पाणी साचून राहत आहे 
शहराचा गावठाणा चा भाग ही परिस्थिती असेल तर उपनगराचा विचारायलाच नको 
गटारी करताना त्याचा नॅचरल ढाळ कुठल्या बाजूला आहे पाणी कुठून कुठे जाणार आहे याची देखरेख कोण सुद्धा करत नाही कारण का तर मजूर सोसायटी काम करतात त्या स्वतः काम न करता ठेकेदारांना काम विकले जाते याचा सगळा हा परिणाम आहे 
आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही कितीही बोंबला आम्ही आमच्या नादात असतो अशी अवस्था सध्या मनपा ची झालेली आहे 
मा आयुक्त साहेबांना विनंती आहे शहरातील गावठाणातील स्ट्रॉम वॉटर सर्वे का खाजगी कंपनी कडून करून घेण्यात आला होता त्यानुसार पुनश्च एकदा सर्वे करून अशा पद्धतीने साचणारे पाणी निचरा करण्यासाठी यंत्रणेला आदेश द्यावे अशी विनंती आहे.
गाव भागात तर सदर ठिकाणी सर्व या घाणीतून नागरिकांना अशा पद्धतीने जाणे येणे करायला लागते त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे तरी याबाबत तात्काळ उपायोजना कराव्यात अशी विनंती आहे 
संघटनेकडे काल रात्री स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या