प्रति,
मा. आयुक्त सो,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.
विषय: - सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करणे बाबत...
महोदय,
नुकताच राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
आम्ही महापालिका क्षेत्रात 1998 पासून म्हणजे महापालिकेच्या स्थापनेपासून वार्डरचना तयार करणे हरकती सुनावणी हे सर्व पाहत आलो आहे
आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या अनुभवानुसार स्थानिक सत्ताधारी पक्षाचे नेते काही संस्थानिक नगरसेवक स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप प्रभाग रचना करताना पाहिलेला आहे.
प्रारूप आराखडा तयार करताना प्रादेशिक असमतोल विशिष्ट समाजाला फायदा होईल विशिष्ट पक्षातील इच्छुक उमेदवारांना फायदा होईल किंवा वर्षानुवर्ष संस्थानिक झालेले विद्यमान सदस्य यांना कशा पद्धतीने फायदा होईल अशा पद्धतीने प्रारूप आराखडा तयार करण्यात येत असतो
मात्र आपण आल्यापासून ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावला आहे नी पक्षपातीपणे , प्रामाणिकपणाने कोणताही भ्रष्टाचार न करता शासकीय नियमानुसार आपण काम करत आहात
त्यामुळे सध्या प्रभाग रचना करताना प्रादेशिक समतोल तसेच मागासवर्गीय वाढ करताना वर्षानुवर्ष तेच तेच प्रभाग मागासवर्गीयांसाठी पडतात त्यामुळे इतर भागातील मागासवर्गीय मतदारांचा अपमान होताना दिसत आहे हाच प्रकार ओबीसींच्या बाबतीत सुद्धा होताना दिसत आहे.
तरी कोणताही भेदभाव न करता पक्षीय दबावाला बळी न पडता वास्तवाला धरून व रोटेशन पाळले जाईल अशा पद्धतीने प्रभाग रचना करण्यात यावी अशी आपणास विनंती आहे.
नाहीतर महापालिकेला लागलेले ग्रहण नुकतेच साबळे यांचे प्रकरण असेल किंवा महापालिका निविदा समिती असेल यातील अधिकारी सदर प्रभाग रचनेमध्ये नसावेत किंवा असल्यास त्यांच्यावर आपले कडक निरीक्षण ठेवून काम करून घेण्यात यावे.
नाहीतर तिथे सुद्धा आर्थिक लागेबंध करून विशिष्ट उमेदवारांना फायद्यासाठी प्रभाग रचना होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी पुनश्च एकदा विनंती आहे
तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीयतेने हाताळण्यात यावी.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.