सांगलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हा मनसे कार्यालयात साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/06/2025 4:50 PM

आज १४ जून सन्मानीय राजसाहेब ठाकरे व शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हा मनसे कार्यालय सांगली येथे मनसे पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केक कापून साजरा केला. यावेळी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतआत्म्यांना दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रामध्ये मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र येण्याचे वातावरण असताना व जनसामान्य जनतेची तीव्र इच्छा असताना सांगली मध्ये शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यालयात उपस्थित राहून राजसाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला..
यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम घेऊन मनसे पदाधिकारी वाढदिवस साजरा करत आहेत यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालीय शैक्षणिक साहित्य वाटप तसेच वक्तृत्व स्पर्धा अशे कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत.आज शिवसेना व मनसेचे पदाधिकारी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले आहेत जशी राजसाहेब व उद्धव साहेब एकत्र यण्याची जनसामान्य जनतेची इच्छा आहे तशीच महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिकांची देखील इच्छा आहे. हे दोघे भाऊ एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर म्हणाले शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांच्या ज्या भावना आहेत त्या दोन्ही नेत्यांनी समजून घ्याव्यात महाराष्ट्र हितासाठी लोक भावनेचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहे.

यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विष्णू अप्पा पाटील,  विराज बुटाले मनसेचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्रीधर करडे, शिवसेना उपजिल्हा संघटक संतोष पाटील शहर प्रमुख प्रसाद रिसवडे मनसे सांगली शहर अध्यक्ष सुरेश टेंगले मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे, शिवसेनेचे अनिल शेटे, गणेश लोखंडे व मनसेचे विजय मौर्य, रोहित घुबडे, अमित पाटील ,स्वप्नील शिंदे, श्रीनाथ कोळी, सागर कोळेकर, प्रशांत कांबळे, अमर औरादे, विकास मगदूम, शुभम खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या