देवळाली कॅम्प येथील शेटे महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनांत B ग्रेड .

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/06/2025 1:14 PM

देवळाली कॅम्प येथील शेटे महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनांत B ग्रेड .
देवळाली कॅम्प येथील एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प  महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनांत सहभाग घेऊन नोंदणी केली होती . दि ५ व ६ जून रोजी महाविद्यालयाचे ऑनलाईन पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले . याप्रसंगी पिअर टिम कमिटीचे अध्यक्ष डॉ.अमित चौधरी , सदस्य डॉ.निरजकुमार सिंग,डॉ. प्रविणकुमार यांनी सात निकषांच्या आधारे महाविद्यालयाची पडताळणी केली.कागदपत्रांची पडताळणी व महाविद्यालय पाहण्यासाठी व्हिडीओ टुर हे या ऑनलाइन कार्यपद्धतीचे मोठे वैशिष्टय होते.पिअर कमिटीने पाठविलेल्या दोन दिवसांच्या पूर्णवेळ वेळापत्रकाप्रमाणे सर्व निकषांची छाननी व पडताळणी करण्यात येवून महाविद्यालयाला B मूल्यांकन श्रेणी प्रदान करण्यात आली .
ग्रामीण भागातील अति उच्च भौतिक सुविधा असलेले तांत्रिक सुविधांनी  युक्त असे उत्तम महाविद्यालय असून असा गौरव नॅक पिअर टिमचे अध्यक्ष डॉ अमित चौधरी यांनी केला .
संस्थेचे सहकार्यवाह व महाविद्यालयाचे समन्वयक जितेंद्र भावसार म्हणाले की,B ग्रेड मूल्यांकन मिळवून महाविद्यालयाची मूल्यांकनाची पायाभरणी झालेली आहे.भविष्यात महाविद्यालय A++ पर्यंतचा प्रवास करेल असा विश्वास भावसार यांनी व्यक्त केला.यावेळी लोणी महाविद्यालयाचे डॉ.अशोक कांबळे,शिरसुंडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उमेश तुपे यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले .
संस्थेचे कार्यवाह श्री सचिन पाटील,यांनी या प्रसंगी म्हणाले की येणाऱ्या काळात महाविद्यालय बीएससी,आयटी,डाटा सायन्स , नर्सिंग या सारखे कोर्सेसला,मंजुरी घेऊन सुरू करण्यात येईल.यावेळी
प्राचार्य डॉ.मृत्युंजय कापसे यांनी संस्थेने पुरविलेल्या सोयी सुविधा बाबत आभार व्यक्त केले .
 कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे , उपकार्याध्यक्ष अनंतराव अथनी , सदस्य भगवान शेठ कटारिया , सदस्या हेमांगीताई पाटील,अनिल कवडे,गणेश चव्हाण यांनी प्राचार्य व सर्व प्राध्यापकांचे अभिनन्दन करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी पालक शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या