ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

उजव्या कालव्या पाठोपाठ ङाव्या कालव्यातुनही पाण्याचा अपव्यय सुरुच? कालव्यातील ताडपञी कोणाची?शेतकऱ्यांची की विभागाची?वृत्त प्रकाशीत होताच शेतकऱ्याचा दावा तर वृत्त प्रकाशित होण्या अगोदर विभागाचा दावा!


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 3/2/2021 8:03:47 AM

पाडळी शिंदे:---
बुलढाणा लघु पाटबंधारे विभाग यांच्या अंतर्गत येणारे शिवणी आरमाळ येथील धरण सिंचन शाखा देऊळगावराजा यांच्या अखत्यारीत असून असून सदर धरणावरून उजवा आणि डावा कॅनॉल असून शेतीसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून कॅनॉल ची झालेली दयनीय अवस्था पाहता मायनर गेट कालवा नादुरुस्त झाडेझुडपे वाढलेली असून  लाइनिंग याची फार बिकट अवस्था झालेली असताना सिंचन शाखा कार्यालय देऊळगावराजा यांच्याकडून  पाटचारी  नादुरुस्त असल्यास पाणी मागणी अर्ज नामंजूर करण्यात येतो.असा फलकसबंधित विभागाच्या कार्यालयातच लावलेला आहे.परंतु संबंधीत विभागाने कालवाच नादुरुस्त असताना ताडपत्री कालव्यात अंथरूण पाणी सोडण्याची पराकाष्टा करून पाणी सोडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.त्या पाठोपाठ आज डाव्या कालव्यातुन गेट नादुरुस्त असल्याने  पाण्याचा अपव्यय सुरुच आहे ते गेट दुरुस्ती करणे आवश्यक असतांना ताडपत्री  नादुरुस्त उजव्या कालव्यात अंथरून पाणी सोडणे संबंधित अधिकारी यांना महत्त्वाचे वाटते सदर प्रकाराबाबत परिसरात विविध तर्कवितर्क काढले जात असून कुठेतरी कालव्यात पाणी मुरल्याची चर्चा सर्वत्र खुलेआम होत आहे. सदर धक्कादायक प्रकार समोर आल्या नंतर वृत्त प्रकाशित होण्याअगोदर संबंधित विभागाने देखभाल दुरुस्ती अंतर्गत सदर ताडपत्री टाकल्याचा गवगवा संबंधित विभागाचे प्रभारी अभियंता रोशन गुघाने यांनी प्रसारप्रसार माध्यम प्रतिनिधींना भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया देतांना सांगितल्या नंतर वृत्त प्रकाशित झाल्या नंतर सदर शिवणी आरमाळ प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील ताडपत्रीवर  पाडळी शिंदे येथील"कृषी मित्र"या व्हाट्सअप ग्रुप वर सदर वृत्तपत्र बातमी टाकून  एका शेतकऱ्याने सदर ताडपञी मी टाकल्याचा व कालवा उकरल्याचा व दीड लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्याचा दावा केला आहे. यामुळे सदर प्रकरणात कुठेतरी पाणी मुरण्याचा प्रकार समोर येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून सदर गंभीर प्रकाराबाबत स्वप्नील शिंदे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा लघुपाटबंधारे विभाग बुलढाणा यांना लेखी निवेदनाद्वारे 16 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले असून कालव्या मधील ताडपञी कुणाची कॅनॉल जर शेतकऱ्याने दुरुस्त केला असेल तर  कुठल्या अटीवर आणि शासनाने जर दुरुस्त केला असेल तर शेतकरी का दावा करीत असून मालकी हक्क दाखवून स्वतःची मालकी हक्क दाखवत आहे.
सदर कालवा शेतकऱ्यांनी जर दुरुस्त केला असेल तर शासकीय मालमत्ता सदर शेतकऱ्यांनी कुठल्या आदेशानुसार उकरली सदर प्रकरणात कॅनॉल ची दुरुस्ती जर विभागाने केली असेल तर शेतकरी का दावा करतो आणि शेतकऱ्यांनी केली असेल तर विभाग का दावा  करतो सदर प्रकरण कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून शासकीय आदेशाची सुद्धा पायमल्ली झाली असून पाटचारी नादुरुस्त असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतो जर कालवा नादुरुस्त असेल तर संबंधित विभागाने ताडपत्री का वापरली व अर्ज का मंजूर का  केले हा प्रश्न उपस्थित होत आहे सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्वप्नील शिंदे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली असून सदर शेतकऱ्याने ग्रुप वर उल्लेख केलेल्या संभाषण च्या प्रति जोडल्या असून सदर प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांनवर कार्यवाही करावी अशी मागणी स्वप्नील शिंदे यांनी केली आहे. 

"बुलढाणा लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोळंकी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.तर प्रभारी अभियंता यांना संपर्क साधला आसता रोशन गुघाने यांनी याप्रकरणी यु-टर्न घेतला असुन कालव्यातील ताडपञी विभागाची नसल्याचा दावा त्यांनी केला."!

Share

Other News