स्मार्ट मीटर विरोधात टप्याटप्याने आंदोलनाची व्यापी वाढवणार, प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2024 2:24 PM

आज सांगली येथे कष्टकऱ्यांची दौलत मध्ये प्रीपेड मीटर ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे नेते माननीय प्रतापराव होगाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली.

सदर प्रीपेड मीटर योजना किती फसवे आहे व त्यामध्ये हजारो कोटीचा घोटाळा होणार आहे तसेच देशांमध्ये राजस्थान गुजरात हरियाणा बिहार ह्या राज्यांमध्ये पाच दहा टक्के ठिकाणी सदर प्रीपेड मीटर बसवण्यात आली आहे त्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे कारण मीटर जम्पिंग होणे तसेच डबल टिबल बिल आकारणी होणे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे आपल्या राज्यात वीज ग्राहकांना त्या पद्धतीने त्रास होऊ नये म्हणून सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून हरकती गोळा करणे व टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवून सदर प्रीपेड योजना विरोध करण्याचा एकमताने ठरले.
पहिला टप्पा म्हणून 3 जून 2024 रोजी सायंकाळी चार वाजता महावितरण मुख्यालय विश्रामबाग व जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्यात येणार आहे.
त्याच दिवशी पुढील आंदोलनाची दिशा ठरण्यात येणार आहे.

आजच्या मीटिंगसाठी सतीश साखरकर, पद्माकर जगदाळे सर,संजय बजाज, उमेश देशमुख,हनुमंत पवार,जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर,नितीन चव्हाण, शंभूराज काटकर,डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण,लालू मिस्त्री, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे,,गजानन साळुंखे, प्रसाद कुलकर्णी, बाळासाहेब पाटील,कलगुंडे पाटील विश्वजीत पाटील सुरेश बिरादार,,जावेद भाई मोमीन, मुकुंद माळी दत्ता पाटील, निलेश पवार,,हरिदास पाटील,सचिन जगदाळे,नितीन मिरजक, डॉक्टर प्रमोद डॉक्टर विजय बचाटे,, एडवोकेट अजित सूर्यवंशी,सौ तेजस्विनी सूर्यवंशी व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या