सांगलीकरांच्या जीवाशी खेळ थांबवा !!!

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2026 9:15 PM

⚠️ सांगलीकरांच्या जीवाशी खेळ थांबवा! ⚠️
कोल्हापूर रोड, कबाडे हॉस्पिटल परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून आज एका निष्पाप नागरिकावर भीषण हल्ला झाला आहे. या घटनेचा 'लोकहित मंच' जाहीर निषेध करत आहे!
रस्त्यावरून चालणे आता जीवघेणे ठरत आहे. प्रशासन अजून किती बळींची वाट पाहत आहे?
आमच्या प्रमुख मागण्या:
✅ हिंस्त्र कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा.
✅ नसबंदी मोहीम युद्धपातळीवर राबवा.
✅ नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्या.
प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर 'लोकहित मंच'द्वारे तीव्र आंदोलन छेडले जाईल!


— मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या