सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टी बाबत स्थगिती देण्यात आली आहे प्रशासनाने लोकनियुक्त बॉडी नसताना एक तर्फी निर्णय घेतला होता सर्व राजकीय पक्षांनी आणि नागरिक जागृती मंच सारख्या सामाजिक संघटना नि विरोध केल्या नंतर पालकमंत्री साहेबांनी स्थगिती दिली होती.
आज दैनिक पुढारी मध्ये रेडिनेकनर दारावर घरपट्टी आकारणी बाबत प्रशासन विचार करत असल्याचे दिसून येत आहे त्याबाबत सर्वांनी अभ्यास करून खास करून नवनियुक्त सदस्यांनी याबाबत विचार करून निर्णय घ्यावा
सर्वसामान्य महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला परवडणारी घरपट्टी असावी त्यांच्यावर अतिरिक्त बोजा नसावा व महानगरपालिकेचे उत्पन्न स्तोत्र अबाधित राहावे या सगळ्यांचा मेळ घालावा.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.