सांगली प्रतिनिधी
बुधवार दिनांक 14/5/2025 रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समिती सांगलीच्या वतीने मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाजवळील छत्रपती संभाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे व महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तरुण पिढीला आपला इतिहास समजावा तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचा ज्वलंत इतिहासाची जाणीव व्हावी, त्यांच्या मनात देव,देश आणि धर्माविषयी जागृती आणि ओढ निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी यावर्षीपासून या जयंती उत्सवात सुरुवात केली आहे.
यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, माजी आमदार नितीन राजे शिंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार,मिरजेचे प्रा. मोहन वनखंडे (सर) माजी, नगरसेविका अनिता वनखंडे, माजी नगरसेवक विष्णू माने, युवक जिल्हाध्यक्ष आकाश माने, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष गणेश थोरवे, राहुल माने, मिलिंद कांबळे रोहित दौंडे, सागर खंडागळे, सिद्धार्थ खंडागळे, शितल थोरवे, राजकुमार शिंदे, प्रतीक माने, राहुल रोहिते, गणेश लोखंडे, मनोज भोसले, हर्षद साळुंखे, ओंकार संत, प्रणव बनसोडे आदि उपस्थित होते.