प्रभाग क्रमांक.०८ मध्ये वारणाली येथे सांगली महानगरपालिकेचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामाच्याबाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पाहणी केली. तसेच उर्वरीत कामाबाबत आमदारांनी आयुक्त सत्यम गांधी व संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हॉस्पिटल पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्याकरिता सूचना केल्या.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ,भाजपा जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, माजी नगरसेवक विष्णु माने, अतुल माने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोसले, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका सोनाली सागरे, प्रशांत राठोड, महेश सागरे, प्रसाद वळकुंडे, वैधकीय अधिकारी डॉ.वैभव पाटील, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.