आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
डंगिरेवाडी ता. माण येथील जयसिंग बाबुराव जगदाळे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी एकूण चार जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
डंगीरेवाडी गावात भरत पंढरीनाथ जगदाळे यांच्या राहत्या घराच्या शेजारील रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास जयसिंग बाबुराव जगदाळे वय- ६७ यांना दगडू काशिनाथ काळोखे, बाळासो काशिनाथ काळोखे,जीवन बाळासो काळोखे, आनंदा दगडू काळोखे सर्व.रा.डंगिरेवाडी या चौघांनी घराच्या शेजारील रस्त्यावर गाड्या आडव्या लावल्याच्या कारणावरून मारहाण केली.
तसेच दगडू काशिनाथ काळोखे याने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा जोर जोरात चावा घेतल्याने त्या बोटाचे एक पेर तुटून पडल्याने बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.
बाळासो काशिनाथ काळोखे, जीवन बाळासो काळोखे आणि आनंदा दगडू काळोखे या तिघांनीही अंगावर धावून येत धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे.
त्यामुळे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहन हांगे करत आहेत.