कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेसला वाढता प्रतिसाद, अतिरिक्त तीन कोचची वाढ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2025 8:26 AM

       कोल्हापुर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता तिन अतिरिक्त जनरल कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
      गाडी क्र.22155/56 कोल्हापुर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ची सुधारीत कोच रचना 2 एसी 1, 3 एसी 1, 3 स्लिपर क्लास, 10 सेकंड सिटिंग, 3 जनरल द्वितीय श्रेणी आणि  2 गार्ड ब्रेक व्हँन असे एकुन 20 कोच असतील.
           कोल्हापुर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता सुरुवातीला या गाडीस एसी व स्लिपर कोच जोडण्यात आले होते आता या गाडीस मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने अतिरिक्त तिन जनरल कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
   याच पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची मागणी असून यासाठी सातत्याने पाठपुरवठा करत असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या