भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावरकर जयंतीचा उत्सव ढोल ताशांच्या गजरात व देशभक्तीच्या जल्लोषात
भगूर वार्ताहर:- भगूर पुत्र क्रांतिकारकांचे मेरुमनी क्रांतीसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयजयकार या घोषणांनी आणि संबळ वाद्यांच्या गजरात भगूर नगरी बुधवारी देशभक्तीच्या रंगांनी रंगून गेली बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांची काल २८ मे रोजी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त भगूर शहरात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत सकाळी गायकवाड गल्ली येथून भव्य ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात सर्वच राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना तसेच सावरकर जयंती उत्सव समितीचे सभासद सहभागी झाले होते यावेळी मी सावरकर या टोपीने सर्वांचे लक्ष वेधले होते प्रत्येक सावरकर प्रेमीच्या डोक्यात मी सावरकर ही टोपी होती तर सावरकर समितीच्या पदाधिकारी यांनी आकर्षक फेटे परिधान केले होते.स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या संसाराची समिधा अर्पण करून भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भगूरपुत्र क्रांतीसुर्य तात्याराव सावरकर यांची जयंती सोहळा भगूर येथे सावरकरांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ८.०० वाजता गायकवाड गल्ली येथून ज्येष्ठ कवी रवींद्र मालुंजकर यांच्या नियोजनाखाली व अध्यक्ष दिपक बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर यांच्या ग्रंथ दिंडीचे आयोजन झाले,नासिक येथील बाळासाहेब देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध गुलालवाडी ढोलपथक ,हभप नारायणराव आडके व सहकारी यांच्या माध्यमातून श्री गजानन महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम,महाराष्ट्र केसरी पैलवान प्रवीण पाळदे यांचे मर्दानी खेळ व मल्लखांब शिष्यवृंद या खेळ तर इगतपुरी येथील आदिवासी मैदानी खेळ सर्वांचेच आकर्षक ठरत होते.यावेळी संवाद्य मिरवणूक पालखीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तके यांची शोभायात्रा सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची शोभायात्रा उघड्या जीपमधून काढून सावरकर प्रेमींना अभिवादन करत होते शोभायात्रा संपूर्ण भगूर शहरातून काढण्यात आली होती सदर सकाळच्या या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम,अभिनेते शरद पोंक्षे,ठाण्याचे आमदार संजय केळकर,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,विश्व हिंदू परिषदेचे एकनाथराव शेटे,
सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ करंजकर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भगूर पंचक्रोशीतील नागरिकांनी व सावरकर प्रेमींनी सदरचा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे सर्वश्री रमेश पवार,प्रताप पवार,राजेंद्र कापसे,शामराव शिंदे,शेखर बागडे,अनिल पवार,दिपक बलकवडे,प्रशांत कापसे,उत्तम शिंदे,उत्तमराव जाधव,हेमंत हेंबाडे,राधाकृष्ण गामणे,तानाजी करंजकर,ज्ञानेश्वर गणोरे, मुकुंद देशमुख,अमोल वालझाडे,निलेश हेंबाडे,गजानन कातकाडे,गोरखनाथ बलकवडे, भारती साळवे,राजन गायकवाड,केशव कासार,वसंत पाटील, राजेंद्र बागडे,अविनाश कातकाडे,मंगेश बागडे,विशाल बलकवडे,प्रताप गायकवाड,शैलेश उदावंत,निलेश ठाकूर,शाम भागवत,रवी येरम,मृत्युंजय कापसे,राजाभाऊ सोनवणे,सुनील थोरात,रंगनाथ करंजकर,रवी महाले,काकासाहेब देशमुख,तानाजी पंकज शेलार,विक्रम सोनवणे, प्रमोद घुमरे,प्रसाद आडके,विशाल बलकवडे,दिपक देशमुख,प्रमोद जाधव,किशोर गायकवाड, संभाजी देशमुख,मंगेश करंजकर,सुमित चव्हाण,सुभाष जाधव,राजेंद्र जाधव,उत्तम आहेर,चंद्रकांत कातकाडे, अमर शिरसाठ,अशोक मोजाड,चेतन बागडे,कैलास भोर,शिवाजी घुगे,रवींद्र देशमुख,सुनील कासार,सचिन हेंबाडे, तुकाराम जगताप, मनोज कुंवर,भूषण कापसे,आकाश नेहरे आदींसह स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे सभासद व सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी तर प्रास्ताविक दीपक बलकवडे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार पोलीस अधिकारी रमेश पवार व शेखर बागडे यांनी मानले.