भाजपा सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सांगली मध्य मंडल व सांगली उत्तर मंडल यांच्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या. सदस्य निवडीचे पत्र जनसंपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आले. यापुढे जे पक्षाचे काम होतील ती तुम्ही ताकतीने करावे आणि आपल्या सोबत अजून नवीन लोकं जोडत जावे, तुम्हाला लागणारी कायम मदत माझ्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून असेल असाच आपला पक्ष वाढवत जावा असे आव्हान यावेळी आमदार धनंजय गाडगीळ यांनी केले.
यावेळी सांगली जिल्हाधक्ष प्रकाश ढंग, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन वाटवे, मंडल अध्यक्ष अमित देसाई, राहुल नवलाई, भाजपा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.