महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. श्री. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सांगली च्या वतीने शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय तोडकर यांच्या नेतृत्वाखाली वृद्ध सेवा आश्रम , कुपवाड येथे नाष्टा व फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. बिरेन्द्र थोरात, संघटक प्रसाद पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष रवी कदम, सरचिटणीस हिम्मत पाटील, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जितेंद्र हेगडे, उद्योग विभाग अध्यक्ष संदीप पाटील, सांगली शहर उपाध्यक्ष संदीप पाटील,विधानसभा कुपवाड शहर अध्यक्ष रोहित बाबर, सांगली जिल्हा चिटनीस तेजस आवटी, प्रशांत लवटे, आदर्श पाटील, दिनेश सादिलगे, मनीष शर्मा, अनिल शर्मा आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.