नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था व एमसीएफ यांच्या संयुक्त विध्यमाने कुपवाडध्ये कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/07/2025 11:39 AM

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकुज चॅरिटेबलट्रस्ट संचलित, अकुज इंग्लिश मीडियम स्कूल. व सौ आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने व MCF टीमच्या संकल्पनेतून शनिवार दिनांक 26जुलै रोजी, कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी सैनिक माननीय विद्याधर उपाध्ये सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उपाध्ये सर यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक हायस्कूल चे पर्यवेक्षक श्री अनिल  चौगुले सर यांनी केले. अकुज इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी चि. प्रज्ञेश माळी व चि.कृष्णा सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अकुज इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थिनींनी 
समूहगीत सादर केले.तसेच उपाध्ये हायस्कूलची विद्यार्थिनी कु. वैभवी सुतार आणि कु. साईप्रिया कांबळे यांनी कारगिल  युद्धाच्या प्रसंगाचे अत्यंत मार्मिक भाषेत वर्णन केले तसेच कु. सृष्टी सावंत हिने ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा. विद्याधर उपाध्ये सर यांनी त्यांच्या स्वानुभवातून विद्यार्थ्यांना अत्यंत रोमांचक प्रसंग सांगून मंत्रमुग्ध केले. मा. उपाध्ये सर यांनी अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी हायस्कूल विभागाचे क्रीडाशिक्षक मा. सिद्धार्थ कांबळे सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी MCF टीमच्या प्रमुख मायुरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले,त्याच बरोबर या कार्यक्रमासाठी हायस्कूल चे मुख्याध्यापक चीरमे सर , अकुज इंग्लिश मिडयम च्या उपमुख्याध्यापिका  रोजिना फर्नांडिस मॅडम, अकुज प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील मॅडम तसेच हायस्कूल चे पर्यवेक्षक अनिल चौगुले सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ. रिया पाटील व कु. अर्चना मगदूम यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या