काल मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी नागपंचमी साजरी करण्यात आली मात्र शांतीनगर मधील बंद झालेली झोपाळ्याची पद्धत परत चालू झालेली पोस्ट बघितल्यानंतर मनाला आनंद झाला
व जुन्या खन भागातील प्रत्येक गल्लीत प्रत्येक मंडळ झोपाळा बांधून लहान मुले व खास करून महिलांसाठी झोपाळा बांधून खेळण्याची पद्धत बघितली होती
बदलत्या आर्थिक सामाजिक परिस्थिती म्हणा उन्नती म्हणा त्याबरोबर जुने पारंपरिक खेळ लुप्त होत चाललेले आहेत
याबाबत खास करून सॅमसग तिवडे व त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन....
जुन्या अशा लुप्त होत चाललेले खेळ असतील परंपरा असतील या जपण्यासाठी खरोखर काहीतरी उपक्रम राबवले पाहिजेत असे वाटते
याबाबत कोण कोण पुढे येत असतील तर आमच्या नागरिक जागृती मंचच्या वतीने सुद्धा आम्ही ह्या पुढाकार घेऊन जुन्या पारंपारिक खेळांच्या बाबत काम करायला तयार आहोत
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
*शांतीनगर मध्ये नागपंचमी सणानिमित्त झोपाळा बांधल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण*
1983 पासून सांगलीच्या शांतीनगर मध्ये नागपंचमीनिमित्त झोपाळा बांधण्याची परंपरा होता.
ही परंपरा 2008 पर्यंत असेच अखंड चालू होते.
पण गेल्या काही वर्षांमध्ये ही नागपंचमीनिमित्त झोपाळ्याची परंपरा थांबली होती, परंतु सॅमसन भाऊ युवा मंच गेली तीन वर्षे झाले, शांतीनगर मध्ये पुन्हा एकदा नागपंचमीनिमित्त झोपाळा बांधला जात आहे.
यामुळे भागातील नागरिकांमध्ये आणि विशेष करून महिलांमध्ये उत्साहाचा वातावर निर्माण झालेला आहे,कारण शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीने झोपाळे करणे, ही प्रथा आता बंद पडत चालली आहे,पण शांतीनगर मध्ये या मंडळांनी लोपपावत चाललेली ही झोपाळ्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू करून आपल्या देशाची संस्कृती जपण्याचे काम केलेलं आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शांतीनगर व राधाकृष्ण वसाहत मधील महिलांनी झोपाळ्याचे पूजन केले.
ए पी आय मा. पाटील मॅडम, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत, सामाजिक कार्यकर्ते गजू बन्ने, यांनी श्रीफळ वाढवून झोपाळ्याचे कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मोठ्या संख्येने यावेळी महिला व लहान मुले उपस्थित होते सर्वांनी या झोपाळ्याचा आनंद घेतला.
मातंग समाजाचे युवा नेते आकाश तिवडे (मेजर) यांनी झोपाळ्या संदर्भात काळजी घेणे कामी महत्त्वाच्या सूचना उपस्थित नागरिकांना दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सॅमसन भाऊ तिवडे, झाकीर नदाफ, विनोद केंचे, विनोद आवळे, इसाक केंचे, दिनेश आवळे, शिवाजी आवळे, महेश मोरे, गणेश कांबळे, माणिक काटकर, संतोष काटकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर झोपाळ्याचे नियोजन सॅमसन भाऊ युवा मंच यांच्यावतीने करण्यात आले होते.