*ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 28/07/2025 11:35 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि.- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या नामांतर सोहळ्याला दहिवडीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव, प्राचार्य दाजी ओंबासे, अक्षय जाधव, गोंदवलेकर महाराज मंदिर संस्थांचे विश्वस्त विजय कुलकर्णी, जयंत परांजपे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने नवनवीन व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करावे, विद्यार्थ्यांना सहज रोजगार उपलब्ध होतील असे प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षण संस्थेला माझी नेहमी सहकार्याची भूमिका राहील. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री श्री. गोरे म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये सहज रोजगार उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही कामाला कमी लेखू नये, त्यातूनच प्रगती साधली जाईल, 

Share

Other News

ताज्या बातम्या