जत तालुक्यातील शेड्याळ हे ग्रामपंचायत असून अनेक वर्षापासून या गावातून एकही पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा तालुक्यापर्यंत नेतृत्व करणारा नेतृत्व या गावातून झालेल्या नाही त्या कारणाने अनेक प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी या गावाकडे दुर्लक्ष केलेले आहेत.. या गावची लोकसंख्या 3000 च्या आसपास असून या गावात अनेक महत्त्वाचे विकासकामे या गावासाठी होणे गरजेचे आहेत.. या गावची ग्रामपंचायत १९६५ साली स्थापन झाली असून गावात सुसज्ज असा ग्रामसचिवालय होणे गरजेचे आहे.. या गावात ज्येष्ठ आणि शाळकरी मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावा लागतो त्यामुळे या गावातून रोज किमान 100 विद्यार्थी शिक्षणासाठी वळसंग व जत या ठिकाणी बसने ये जा करतात त्यांच्यासाठी एक सुसज्ज बस स्टॉप होणे गरजेचे आहे.. व या गावासाठी मागे विधानपरिषद आमदार यांच्या फंडातून एक तलाठी कार्यालय देखील मंजूर झालेली होती पण तो DPDC निधी अभावी तो काम सुरू झालेले नाही.. त्यामुळे या गावचा लोकसंख्येचा व शेतकऱ्यांचा गैरसोय दूर होण्यासाठी या गावासाठी एक स्वतंत्र तलाठी कार्यालय व एक स्वतंत्र तलाठी यांची नेमणूक करावी.. व गावात सुसज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक भवन होणे गरजेची आहे.. गावातून अनेक वाडीवस्त्याकडे जाण्यासाठी काँक्रीटचे रस्ते होण्याची गरज आहे.. पावसाळ्यात गावातील अनेक ठिकाणी पाणी निचरा होत नाही अशा गावातील प्रमुख चौकातून अनेक ठिकाणी RCC गटारी होणे गरजेचे आहेत..
या गावासाठी अशा या अनेक विकास कामाची गरज आहे तरी जिल्हा नियोजन समिती (DPDC) मधून या गावासाठी विशेष निधी देऊन या गावच्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या व विकासापासून वंचित राहिलेल्या कामासाठी निधी मिळावा.. अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी जिल्हा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ स्नेहल कनिचे मॅडम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे..