कुपवाड: येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या महाआरोग्य व रक्तदान शिबिरात सुमारे सहाशे हुन जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. आज रविवारी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं. १, मेन रोड, कुपवाड येथे हे शिबीर झाले.
आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे सर, राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अमित खाडे, प्रदेश संपर्कप्रमुख सचिन सरवदे, सातारा जिल्हाध्यक्ष ॲड अश्विन पाटील, सांगली जिल्हा सल्ला चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम, कुपवाड पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी नगसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक गजानन मगदूम, आण्णासाहेब उपाध्ये, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरात, मिरज विधान सभा अध्यक्ष महादेव दबडे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक शेटजी मोहिते, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी, प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील, प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील, शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला जिल्हा अध्यक्षा राधिका हारगे, मिरज महिला शहराध्यक्ष शितल सोनवणे, उद्योग आघाडी शहर जिल्हाध्यक्ष संजय कदम, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष मुनीर मुल्ला, कामगार सेल शहर जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी, अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्याध्यक्ष तोहीद शेख, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष सुनीता जगधने, शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सुरज कासलीकर, दिनकर चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जयंत जाधव, वैद्यकीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष अजीम पठाण, वैद्यकीय कक्षाची कार्याध्यक्ष सद्दाम खाटीक, कुपवाड राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अरुणतात्या रुपनर, कुपवाड शहर युवक अध्यक्ष दादासो कोळेकर, युवक शहरजिल्हा सरचिटणीस मुद्दसर मुजावर, अल्पसंख्यांक शहरजिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर, युवक कुपवाड राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अजय कोरे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सागर माने, युवा नेते बल्लू शाखला, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष तोहिद फकीर, शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजेजाधव, युवती जिल्हाध्यक्ष प्रणोती हिंगलजे, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष केवली उपाध्ये यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिराचे संयोजन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड, राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष यांचे वतीने शिबिरामध्ये दंत तपासणी विभाग, कर्क रोग विभाग, हृदय रोग विभाग, स्त्री रोग विभाग, बाल रोग विभाग, कान-नाक - घसा विभाग, किडणी रोग विभाग, डोळे तपासणी विभाग, ऑर्थो हडांचा विभाग असे विविध विभागातील तज्ज्ञ् डॉक्टर उपलब्ध होते. 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शेकडो नागरिकांनी डोळे तपासणी घेतली करून घेतले असून 32 रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर सतरा रुग्णांची ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया होणार आहे. कर्करोगाच्या तपासणीमध्ये सात रुग्ण आढळले असून त्यांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. सुमारे सहाशे हून अधिक नागरिकांनी या शबिराचा लाभ घेतला.
आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, राज्यातील नागरिकांच्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी आरोग्य शिबीर घेऊन गरीब आणि गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या तपासणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मशनरी बसवण्यात आलेले आहेत.
शहर जिल्हाध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे म्हणाले, कुपवाड परिसरातील गरजू नागरिकांना आरोग्य तपासणी आणि उपचार करता यावेत तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी हे शिबिर आयोजित केले होते.
वैद्यकीय मदत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अमित खाडे म्हणाले, राज्यभरात कुणाला कसलीही वैद्यकीय मदत लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही ती करत असतो. उपचारा विना कोणीही राहणार नाही याचे काळजी घेतली जाते. शासकीय योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा कार्य आमच्या पक्षामार्फत केले जात आहे. त्यासाठीच अशी आरोग्य शिबिरे आम्ही घेत असतो.
कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी स्वागत व प्रस्तावित केले. सूत्रसंचालन शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव यांनी केले. युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने यांनी संयोजन केले. शिबिरामध्ये चोपडे मेमोरियल ट्रस्ट सांगली, द्वारकानगर प्राथमिक आरोग्य केंद्र मिरज, होरिझोन हॉस्पिटल सांगली, वसंत दादा डेंटल कॉलेज सांगली, सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली, किम्स उमाज हॉस्पिटल, मेहता हॉस्पिटल सांगली, श्री मॅटरनिटी अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कबाडे हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, सुदर्शन आय हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल आणि तज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला.