आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर गुन्हयातर्गत तात्काळ कारवाई व्हावी , सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस श. प. पक्षाकडून निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/07/2025 7:39 PM

सांगली : आज भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सायबर गुन्ह्यांतर्गत तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून महिला पदाधिकारी यांनी पोलीस उपअधीक्षक यांना भेटून निवेदन दिले 

सद्यःस्थितीत देशात आणि महाराष्ट्रात सायबर सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. राजकीय विरोधकांच्या वैयक्तिक आयुष्यात अतिक्रमण करणे, त्यांचा ई-मेल, फोन अथवा डिजिटल माहितीचा सत्तेच्या आधारे गैरवापर करणे, हे केवळ नैतिकदृष्ट्या अयोग्यच नव्हे, तर भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली सायबर गुन्हा आहे.

मागील काही दिवसांमध्ये मा. एकनाथराव खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याशी संबंधित प्रकरणात भाजपचे चाळीसगावचे आमदार मा. मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या खाजगी Gmail अकाऊंटमधील माहिती व दस्तऐवज सादर केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. संबंधित व्यक्तीकडून कोणतीही अधिकृत संमती न घेता, वैयक्तिक डिजिटल माहितीचा खुला प्रसार करणे हा स्पष्ट सायबर गुन्हा ठरतो.

भारताच्या संविधानातील अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक नागरिकाला "जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा" मूलभूत अधिकार आहे. यामध्ये "गोपनीयतेचा अधिकार (Right to Privacy)" अंतर्भूत आहे, ज्याची मान्यता सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्टपणे दिली गेली आहे. या घटनात्मक अधिकारावर कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याने अतिक्रमण करणे हे लोकशाही व्यवस्थेचे अपमानास्पद उल्लंघन आहे. असे निवेदनात म्हंटले आहे

तसेच यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी  महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदनात खालील मागण्या ही करण्यात आल्या

1) मा. मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार तात्काळ सायवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

2) कोणताही राजकीय नेता असला तरी कायद्याच्या अधीन आहे, याचा संदेश समाजात गेला पाहिजे. सायबर गुन्हेगारीसाठी कोणतीही प्रतिमा-रक्षणे वा राजकीय दबाव मान्य होणार नाही.

3) महिलांच्या वैयक्तिक आयुष्याच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या सायबर गोपनीयतेच्या रक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा व तत्काळ प्रतिसाद व्यवस्था अधिक बळकट करण्यात यावी. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन लोकशाही मूल्ये, महिला सन्मान आणि वैयक्तिक हर्काच्या रक्षणासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत. अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली 

यावेळी महिला सांगली जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे,उज्वला पाटील, अनिता  पांगम ,सायली गौदिल ,छाया जाधव ,सुवर्णा नाईक ,रुपाली घुमटे ,वैशाली धुमाळ ,कांचन माळी, शारदा माळी, सुजाता वीरभद्र ,प्रियांका विचारे ,उषा चौगुले , रईसा चिंचणीकर ,माधुरी कुलकर्णी, शोभा झेंडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .

Share

Other News

ताज्या बातम्या