मा. मंत्री जयंत पाटील यांची कंत्राटदार स्व हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी कुंटुबियांची भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/07/2025 9:21 AM

वाळवा तालुक्यातील तरुण कंत्राटदार स्व. हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी काल माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते. 

शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने सरकारवर विश्वास ठेवला होता, त्याच्या वरच्या कंत्राटदारांवर विश्वास ठेवला होता. पण सरकारने त्यांची थकीत बिले काढली नाहीत. त्यामुळे तो आर्थिक संकटात आला आणि शेवटी त्याने नाईलाजाने आत्महत्या केली. 

या सरकारने ५ लाख कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रुपयांचे बिले थांबवली आहेत. निवडणुकीच्या आधी सरकारने खोटी आश्वासने दिली, कामांची उद्घाटने केली. आता सरकारकडे द्यायला पैसे नाहीत. याचा परिणाम राज्यातील प्रत्येक घटकांवर होत आहे. मी वारंवार कंत्राटदारांना सांगायचो की, या सरकारवर भरोसा ठेवून कामे घेऊ नका. सरकार जेवढे पैसे देईल तेवढेच काम करा. या सरकारवर आगाऊ विश्वास ठेवून कामे करू नका. आज काय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नाही तसे कंत्राटदारांच्या बाबतीत घडू नये अशी भीती आहे‌. 

आज हर्षलला जाऊन आठवडा झाला, सरकारतर्फे इथे कोणीच आले नाही. कुटुंबाला मदत सोडा, सरकारमधील एकही व्यक्तीने त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली नाही. उलट हर्षल सरकारचा कंत्राटदार नव्हता म्हणून हात झटकून टाकण्याचा प्रकार करत आहे. सरकारने मूळ कंत्राटदारांचे बिले दिले असते तर हर्षल सोबत हा प्रकार झाला नसता असे मत यावेळी व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या