आर्य चाणक्य ब्राह्मण एकता मंच वतीने प्रशांत कापसे यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/07/2025 9:14 PM

आर्य चाणक्य ब्राह्मण एकता मंच, इंदिरानगर नाशिक तर्फे आयोजित स्वा.सावरकर निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा आज स्वा.सावरकर सभागृह, इंदिरानगर, नाशिक येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन सुरेश कुलकर्णी ( सप्तश्रुंगी दुग्धालय ) हे होते.
भगूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत रामदास कापसे यांना याच सोहळ्यात . ॲड. सतिश बाल्टे स्मृति पुरस्काराने गौरवण्यात आले.
स्वा सावरकर यांनी आपल्याला ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच समर्थपणे सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो हे सांगितले त्यामुळे सर्वांनी आपल्या फिटनेस कडे लक्ष द्या असे आवाहन याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात श्री. सचिनजी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मोठ्या गटातून प्रथम क्रमांक नेहा विनायक मते, द्वितीय क्रमांक योगिनी तेजस शुक्ल, तृतीय क्रमांक प्रशांत नारायण कुलकर्णी तसेच लहान गटातून प्रथम क्रमांक आदिती सुनिल भोसले, द्वितीय क्रमांक प्रतिक्षा राजेंद्र बावळे व तृतीय क्रमांक श्वेता मनोहर कनावजे यांनी मिळवला. आर्य चाणक्य ब्राह्मण एकता मंचातर्फे सर्वांना सन्मानचिन्ह, रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले.
उपस्थित सर्व सहभागी स्पधर्कांना सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रास्ताविक श्री. विलास पाटणकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. वैभव उपासनी तर आभार प्रदर्शन श्री. भूषण काळे यांनी केले. परीक्षण श्री.जयंत लक्ष्मीकांत उपासनी,माजी प्राचार्य वसंतराव नाईक विद्यालय, सटाणा यांनी केले. 
सौ.सीमा प्रसाद देशपांडे, विनया वैभव उपासनी, पल्लवी  भूषण उपासनी, सतिश कोल्हटकर, श्री. सेवेकरी काका व बहुसंख्य स्पर्धक उपस्थित होते. श्री. सेवेकरी काकांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वंदे मातरम्
भारत माता की जय
स्वा.सावरकरांचा विजय असो या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या