रस्त्यावरील मैलाच्या दगडांचे रंग वेगवेगळे का असतात ?

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 20/05/2022 10:06 PM


आजकाल जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या हातात असतं.
 एका क्लिक वर आपल्याला ते मिळत. 
आपण कुठे लांब प्रवासाला निघालो की,
 गुगल मॅप ऑन करून त्यावर रस्ता बघत आपल्या ठरलेल्या स्थळी पोहोचतो. 
मोबाईल, इंटरनेट किंवा एकंदरच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपले जीवन अगदी सुकर झाले आहे. 
पण कल्पना करा जर एखाद्यावेळी तुम्ही प्रवासाला निघाले आणि तुमच्या फोनला नेटवर्क नसेल किंवा फोन बंद पडला तर अशावेळी काय करणार..? 
रस्ता कसा शोधणार ?
 तर तेव्हा कामी येतात आपल्या रस्त्याच्या बाजूला असणारे मैलाचे दगड.
 तेच बनतात आपले वाटाडे...

कुठेही प्रवासाला निघाल्यावर रस्त्याच्या बाजूला किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी लावलेले दगड आपले लक्ष्य वेधून घेतात. 
या दगडांवर गाव, शहरांची नावे त्यांच्या अंतरासहीत दर्शवलेली असतात.

मात्र अनेकदा या दगडांचे रंग वेगवेगळे का ?असा प्रश्न पडतो. 
म्हणजे काळा, पिवळा, हिरवा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगानी या दगडांचे शेंडे रंगवले जातात. त्यामागे काही खास कारणे आहेत. 
हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो.
 मात्र अनेकांना त्या रंगाचा अर्थ माहीती नसतो. 
लांबच्या प्रवासाला जाताना या दगडांच्या रंगांवरून अंतराचा आणि रस्त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
 म्हणूनच जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

⭕हिरवा-पांढऱ्या मैलाचा दगड राज्य महामार्ग सुचित करतो.
 या रस्त्यांच्या देखरेखीची जबाबदारी राज्य सरकारची असते.
⭕ तर पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड राष्ट्रीय महामार्ग दर्शवण्यासाठी वापरला जातो. 
जर रस्त्याच्या कडेला पिवळ्या पांढऱ्या दगडांवर अंतर लिहीलेले दिसले तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात असे समजावे. 
⭕पिवळा-पांढऱ्या रंगाचा दगड हा राष्ट्रीय महामार्गावरच वापरला जातो.
⭕ नारंगी-पांढऱ्या रंगाच्या दगडाचा अर्थ असा होतो की तो रस्ता 'प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने' अंतर्गत बांधण्यात आला आहे. 
मुख्य महामार्गापासून एखाद्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे नारंगी पांढरे दगड दिसतात.
 तर प्रवासादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या किंवा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा दगड दिसल्यास तुम्ही एखाद्या मोठ्या शहराजवळ आहात असे समजावे.
 हे रस्ते त्या शहराच्या जिल्ह्याच्या अंतर्गत असतात.
 जिल्हा प्रशासन त्यांच्या देखरेखीची काळजी घेते.

अशा प्रकारे विविध रंगांचा वापर करून विविध प्रकारची माहिती आपल्याला पुरवली जाते.
 तेव्हा फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता या गोष्टी देखील डोळसपणे पाहणे तेवढेच निकडीचे आहे.

- *अतुल चव्हाण*
*मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे..*

Share

Other News

ताज्या बातम्या