श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मराठी चित्रपट श्रृष्टीसह हिंदी सिने श्रृष्टीतील अभिनय सम्राट व हास्यसम्राट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन याठिकाणी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना कला क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये गंभीर आणी हास्य भुमिका केल्या आहेत. त्यातील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, "हा पुरस्कार माझा नसून प्रेक्षकांचाच आहे, ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं हे त्याचेच प्रतिक आहे,
यासोबतच त्यांनी नम्रपणे सांगितले की, मला दिलेला पुरस्कार हा माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे, "माझं फक्त असं होतं की, मिळायला पाहिजे... तेच साध्य करायचं मी ठरवलं होतं. आणि ते आता साध्य झालं." त्यांनी हा सन्मान प्रेक्षकांना, आपल्या सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना आणि प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक कलाकाराला समर्पित केला आहे. या पुरस्कारामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
अशोक सराफ यांचे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या अभिनयातील विनोदी आणि गंभीर भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत. पद्मश्री पुरस्काराने त्यांचे हे योगदान अधिकच गौरवले गेले आहे.
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे (वाघोली) येथील भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास पवार, मार्गदर्शक प्राचार्य टी. इ. शेळके, प्राचार्य शंकरराव गागरे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, शिवाजीराव बारगळ, पत्रकार प्रकाश कुलथे, बी.आर.चेडे,शौकतभाई शेख, भीमराज बागुल, कचरू महांकाळे आदींनी अभिनंदन केले.
अशोक सराफ यांचे भूमी फाऊंडेशन या संस्थेला नेहमी सहकार्य असते.त्यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्याचे भूमी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ कैलास पवार यांनी सांगितले.
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे
शिरसगांव ता.श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111