मनपाच्या व्हॉटस अॅप नंबरचा नुसताच बोभाटा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/05/2025 1:18 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या क्षेत्रातील तक्रारी सदर व्हाट्सअप नंबर वर नोंदवाव्यात त्याचे निराकरण केले जाईल असे तत्कालीन आयुक्त यांनी सांगितले होते 
राज्य सरकारने शंभर दिवसाचा प्रोग्राम दिला होता त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करायचे असे ठरले होते.
मात्र सदर व्हाट्सअप नंबर वर नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यावर आपण संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.   
व आपल्या तक्रारीचे निराकरण केले आहे असे मेसेज लगेच येतात मात्र सदर तक्रारी आहेत तशाच  पडलेल्या असतात मग ह्या व्हाट्सअप नंबर चे नाटक कशासाठी.. आणि कोणासाठी... नागरिकांना उल्लू बनवण्यासाठी....

मा आयुक्त साहेबांना विनंती आहे याबाबत एक तर त्या नंबर वर आलेल्या तक्रारींचं निराकरण झालं पाहिजे नसेल तर ते नंबर बंद करून टाका डोक्याला ताप नको नागरिकांना वाटते आपण मनपापर्यंत तक्रार पोचलेली आहे आणि आपले काम आज होईल उद्या होईल या आशेने बसतात व त्यांची निराशा होते.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा..

Share

Other News

ताज्या बातम्या