दराडे यांनी लावला मोटरी चोरांचा छडा ९ गुन्ह्यांचा केला उलगडा १२ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 01/08/2025 9:53 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क न्यूज 
(विजय जगदाळे)

दहिवडी दि:माण तालुक्यातील
दहिवडी पोलिस पोलीस स्टेशन हद्दीतील चोरट्यांनी विविध ठिकाणाहून मोटारसायकली, शासकीय गोडावून, व्यापारी शाळा आणि घरातून चोरी केलेल्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या चोरीप्रकरणी तपास करत असताना दहिवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ९ गुन्ह्यांचा छडा लावला असून, एकूण १२ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत दहिवडी, माण, सातारा आणि कराड परिसरातील आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेले मोटारसायकली, जनरेटर, स्पीकर, वायरिंग साहित्य, गॅस सिलिंडर, टेबल व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुख्य आरोपींकडून विविध भागांतून चोरीस गेलेली ६ मोटारसायकली व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, चोरीप्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध विविध ठिकाणी दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
यामध्ये प्रवीण बापूराव चव्हाण, विकास तानाजी चव्हाण, अनिल नंदकुमार दळवी, सौरभ संतोष अवघडे, अजय आनंदा चव्हाण, प्रशांत बापूराव चव्हाण, सुमित रामचंद्र पाटोळे, मुकेश आबा अवघडे, गौरव संजय चव्हाण, आणि एक अल्पवयीन अशा एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलिस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलीस हवालदार बापू खांडेकर, तानाजी काळेल, विजय खाडे, रामचंद्र गाढवे, नितीन धुमाळ पोलिस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, गणेश खाडे यांनी ही कारवाई केली.
ही कारवाई ही दहिवडी पोलीस ठाण्याच्या इतिहासातील मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 : दहिवडी पोलिसांनी हस्तगत केलेल्या मोटरी वायरी तांदूळ गहू

Share

Other News

ताज्या बातम्या