श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज सांगली येथे शुक्रवार दिनांक 1/8/25 रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी बी सावळवाडे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवले .शाळेच्या पर्यवेक्षिका सौ जे एस इचलकरंजे मॅडम या प्रसंगी उपस्थित होत्या. शिक्षकेतर प्रतिनिधी श्री सागर तामगावे सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले व श्री वाघमारे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले . इयत्ता दहावी अ मधील जान्हवी खोत या विद्यार्थिनीने मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे ग्रंथपाल श्री वाघमारे सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली . इयत्ता दहावी अ मधील विद्यार्थिनी गीत सौंदडे हिने अण्णाभाऊ साठे व साक्षी कोळी हिने लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगितली . शाळेचे मुख्याध्यापक श्री बी बी सावळवाडे सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले .कुमारी स्नेहल साळुंखे हिने सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन सृष्टी माने हिने केले . या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी अ मधील विद्यार्थिनींनी केले व त्यांना मार्गदर्शन वर्गशिक्षिका सौ ए आर अमण्णावर मॅडम यांनी केले अशा तऱ्हेने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.