हाय सिक्युरिटी रजिस्टेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ मिळावी : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/08/2025 5:29 PM

प्रति
मा.नाम.देवेंद्र फडणवीस 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

विषय : - आपल्या महाराष्ट्र राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (hsrp) बसविण्यासाठी मुदत वाढ मिळणे बाबत 

राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट, २०२५ रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर १० हजार रुपयांचा भुर्दंड न देता, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ही विनंती करतो. 

वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे ७०% जुन्या वाहनांवर HSRP प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, शासनाने मुदतवाढ देण्याची गरज आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या