सांगली स्टॅन्ड ते कोल्हापूर रोड या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून यामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर सांगली मिरज उत्तम असणाऱ्या रोडवर टक्केवारीच्या अमिषापोटी पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या कामाची चौकशी व्हावी तसेच या कामात कोट्यावधीचा घोटाळा झालेला आहे. त्याचीही चौकशी करून संबंधित ठेकेदारावर अथवा सार्वजनिक बांधकाम प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी मी, लोकहित मंचच्या वतीने दूरध्वनी वरून संपर्क साधला. मात्र त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी याबाबत बोलणे झाले. या संबंधात निवेदन देऊन रीतसर तक्रार करण्यात यावी असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.*
*मनोज भिसे-अध्यक्ष, लोकहित मंच सांगली*