गुंठेवारी चळवळीचे जनक, जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जागवल्या जुन्या आठवणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2025 9:36 PM

आठवण १५ ऑगस्ट १९९६ झेंडावंदन..

तो दिवस होता १५ ऑगस्ट १९९६ स्वातंत्र्याचा सुवर्णं महोत्सव तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगोडा कारकिर्दीत देशभर साजरा झाला. 

सांगली येथील संजयनगर भागातून १९९४ ला गुंठेवारी चळवळ सुरु, गुंठेवारी धारकांना हिरव्या पट्ट्यात राहती घरे मालकीची व्हावीत यासाठी आक्रमक आंदोलने बाळसे धरू लागली तो काळ.

रोज न्यूज पेपरला बातम्या. प्रचंड प्रसिद्धी. जन संपर्क यामुळे चर्चेत आलो होतो. संजयनगर हा सामान्य नागरिकांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, हमाल बांधवांचे वास्तव्य असलेला परिसर.संजयनगर प्राथमिक शाळेत ५० वा स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला जाणार होता. कांबळे गुरुजी हेड मास्तर होते.त्यावेळी पाहुणा कोण निमंत्रित करायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. कांही शिक्षकांनी माझे नाव सुचवले. आपल्या भागातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती चंदनदादा चव्हाण. मी दुर संचालन निगम वरती खा. प्रकाशबापू पाटील यांनी माझी सदस्य म्हणून नियुक्ती केली होती.त्यामुळे देशात कुठेही कॉल करण्याची मुबा असलेला फोन घरी टेलिफोन खात्याने जोडला होता. अनेक लोक माझा नंबर द्यायचे निरोप यायचे कॉल करण्यासाठी घरी लोक यायचे. त्यामुळे शिक्षकांना व कांबळे गुरुजींना माझ्यावर आर्थिक मजबूत असलेली व्यक्ती आहॆ असे वाटले होते,त्यांना निमंत्रित करूया असे ठरवले होते. आणि सकाळी मला कॉल आला " चंदनदादा तुमच्या हस्ते आमच्या शाळेत ५० व्या स्वातंत्र्य दिना निमित्त झेंडा वंदन करायचे आहॆ आणि आपण उपस्थित रहावे. मी विचारले आपल्या शाळेस काय भेट घ्यावी लागेल कळवा. त्यावेळी अगोदर आठ दिवस भेट पोहोचेल. असे कळवले शिक्षकांना आनंद झाला.

मी यशवंतनगर येथील जैन सोसायटीत दैनिक अग्रदूतचे सांपादक कै. बापूसाहेब कुंभोजकर यांचे शेजारी घोगडे आज्जी यांच्यात भाड्याने राहत होतो.सात आठ महिन्याचे भाडे थटले होते.म्हणून सकाळी लवकर बाहेर पडत होतो आणि रात्री उशिरा घरी येत होतो. ही खरी परिश्थिती.

तीन दिवसावर स्वातंत्र्य दिन आला होता. शिक्षक घर शोधत आले.सकाळची वेळ होती.घोंगडे आज्जी नेहमी प्रमाणे भाडे मागण्यासाठी दारात मोठ मोठ्या आवाजाने बोलत होती.तेवढ्यात शिक्षक पोहोचले. त्यांना वाटले आपली गल्लत तर झाली नाही ना? हा कार्यकर्ता शाळेला मदत करू शकणार नाही असे अनेक शंकने त्यांना घेरले होते. आमच्या सौ बाहेर होत्या त्यांनी सांगितले की संजनगर शाळेतील शिक्षक भेटायला आले आहेत. मी उठून बाहेर आलो. त्यांना आदराने घरात बोलावले. आज्जी ओरडत होती हा काय तुमचे काम करणारा नाही माझेच भाडे अनेक महिन्याचे दिले नाही. आज्जीची समजूत घालून शिक्षकांना घरात घेतले. त्यावेळी एक कॉट, खा. बापूनी खासदार फंडातून दिलेले गॅस कनेक्शन व फोन व एवढ्यात महत्वाच्या वस्तू घरात.टी व्ही तर खूप लांबची गोष्ट, चहा करायला सांगितले शिक्षकांना वाईट वाटले. त्यांनी नकॊ म्हटले. शेवटी शिक्षकांनी माझे नाव जाहीर केले होते. त्यांना माझ्या परिस्थितीचा अंदाज आला आणि मला म्हटले आम्ही शिक्षक मिळून वर्गणी काढून शाळेस टी व्ही आणतो आणि तुम्ही दिलाय हे जाहीर करतो. शिक्षकांचा चांगुल पणा मुळे मला काय बोलावे सुचत नव्हते.

त्या प्रसंगी माझ्या पत्नीने भाडे देण्यासाठी साठवून ठेवलेले १५०० रु माझ्या हातावर ठेवले. माझ्या घरी टी व्ही नाही हे त्यांनी पाहिले.माधवनगर मध्ये माझा लहानपणीचा जिवलग मित्र, क्लासमेंट विजय कोरडे यांचे कोरडे इलेक्ट्रॉनिक दुकान होते. आज ही आहॆ.ते हप्त्यावर टीव्ही फ्रिज देत होते. त्याना फोन वरून वस्तुस्थिती सांगितले. ते म्हणाले शिक्षकांना दुकानात लगेच घेऊन ये म्हटल्यावर त्यांना घेऊन गेलो. गोरगरिबांची लेकरं शासकीय कार्यक्रम पाहावेत हा शिक्षकांचा उद्देश होता. विजय कोरडे म्हणाले कोणता टीव्ही पसंद आहॆ तो घ्या. मी थोडा भावनिक झालो खरे मित्र वेळेला धावून येतात हे अनुभवले. शिक्षक म्हणाले नाही यांची परिस्थिती नाही आम्ही आपणास पैसे आणून देतो. विजय कोरडे म्हणाले हे दुकान आमच्या चंदनचे आहॆ असे समाजा आणि निसंकोच घ्या. शिक्षकांनी जानले आणि एक टीव्ही घेतला. तो नकॊ म्हणताना माझ्या जवळचे १५०० रु दिले. त्यावेळी आता यापुढे राहिलेली रक्कम देऊ नकोस तू जशी मदत करत आहेस त्या प्रमाणे उर्वरित मी मदत केली असे समजा म्हटल्यावर शिक्षकांना दिलासा वाटला.

१५ ऑगस्ट दिवशी माझ्या हस्ते शिक्षकांनी झेंडावंदन केले. त्याकाळी नगरसेवक रमेश सर्जे, सामाजिक कार्यकर्ते मानसीग सकटे, शशिकांत कांबळे यांच्या सह या भागातील मान्यवर उपस्थित होते. माझे थोडक्यात भाषण झाल्यावर हेडमास्तर कांबळे गुरुजी भाषणास उठले भाषणाच्या शेवटी बोलले शाळेला टीव्ही देताना आलेला प्रसंग सांगत होते त्यांचा कंठ दाटून आला. जीवनात प्रपंच सांभाळून सामाजिक कार्य करताना संघर्ष, सामाजिक जाण याची सांगड घालताना तारेवरची कसरत कशी होते. हे मी चंदनदादा यांच्या सारखे कार्यकर्ते अनुभले. गुरुजींचे भाषण ऐकताना शांतता होती.... जीवनातील हा कटू प्रसंग नियतीनेच निभाऊन नेला... जय हिंद.. 🇮🇳

चंदनदादा चव्हाण.
गुंठेवारी चळवळीचे जनक व जयहिंद सेना पसप्रमुख.

Share

Other News

ताज्या बातम्या