राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या २ पदाधिकाऱ्यांचे चार दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू
जिल्हा परिषद शाळेस नियमबाह्य इयत्ता आठवी वर्ग वाढीचे प्रकरण; शिक्षण विभागाचे उपोषणाकडे दुर्लक्ष
लातूर : पद्मश्री, पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणीत राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या लातूर शाखेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे. लातूर तालुक्यातील एकुरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस नियमबाह्य इयत्ता आठवीच्या वर्गाला दिलेली मान्यता रद्द करावी आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे.
राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी आणि तालुकाध्यक्ष असलम शेख हे गेल्या १४ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करत आहेत. एकुर्गा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस इयत्ता आठवी वर्गाला मान्यता देताना शासन निर्णय डावलून काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. लातूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने लेखी पत्राद्वारे उपोषणकर्त्यांना दिलेल्या माहितीतून ही बाब दिसून येत आहे. या पत्रात शासनाच्या एका जीआर च्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. मात्र या जीआर मध्ये वाढीव तुकडीला मान्यता न देता तुकडी बंदीच्या संदर्भाने निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळेच गेल्या चार दिवसांपासून उपोषणकर्ते रामेश्वर सूर्यवंशी आणि असलम शेख यांनी आपले आमरण उपोषण अद्यापही सुरूच ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या संपूर्ण प्रकरणात काय पावले उचलणार यासंबंधीचे लेखी पत्र दिल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस आठवीचा वर्ग नसल्यामुळे तिथल्या विद्याथ्यांना पाच किलोमीटर पायपीट करून एका
खाजगी शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. या ठिकाणी वाढीव आठवी वर्गाची गरज असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे उपोषणकर्ते रामेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची न्यासने मागणी केली आहे. यावेळी उपोषणस्थळी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे शहराध्यक्ष धीरज तोष्णीवाल, आदित्य सूर्यवंशी, अनिकेत वलांडे, बापूसाहेब मगर, वीर सकट, रवी गायकवाड, संजू चन्नागिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सोबत :
1. शिक्षण विभागाने 14 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या वेळी उपोषणकर्त्यांना दिलेले लेखी पत्र या पत्रात उल्लेख असलेला जीआर
2. जिल्हा परिषद प्रशासनाला कारवाई संबंधी न्यासने दिलेले पत्र
जिल्हा परिषद शाळेस नियमबाह्य इयत्ता आठवी वर्ग वाढीचे प्रकरण; शिक्षण विभागाचे उपोषणाकडे दुर्लक्ष