दिनांक 14 ऑगस्ट रोजी माझ्या प्रभाग क्रमांक 18 मधील हनुमान नगर येथील ऑक्सिडेशन पॉईंटच्या खुल्या जागेत मी स्वतः लोकप्रतिनिधि नगरसेवक असताना भाजी मंडई चे काम मंजूर करण्यात आलेले होते. त्याचवेळेस सदर कामाची सुरुवात करताना या भाजी मंडईस असणारा संलग्न गुलाब कॉलनी पासून हनुमान नगरपर्यंत थेट जोडणारा रस्ता सुद्धा डांबरीकरण मंजूर करण्यात आलेलं होते. या दोन्हीही विकासकामासाठी माझ्या प्रयत्नातून सुरुवात करण्यात आलेली होती आणि आज रोजी ही मंडईची वास्तू व रस्ता व स्वच्छता गृहासहित इतर सोयी सुविधा देखील पूर्णतत्वाकडे आलेल्या आहेत. सदर भाजी मंडई ला येथील प्रभाग क्रमांक 18 तसेच प्रभाग क्रमांक 17 या आसपासच्या दोन्हीही प्रभागातील नागरिकांची भावना आहे की या मंडळीचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली असे करण्यात यावे. आणि त्यास अनुसरून मी तीन मार्च 2025 रोजी माझ्या वतीने याबाबतची रीतसर मागणी निवेदन देऊन केलेली होती. परंतु आज काम पूर्णत्वाकडे आलेला असताना आणि सदर भाजी मंडई येथे लोकार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर या भाजी मंडईला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका भाजी मंडई असा नाम फलक लावण्यात आलेला आहे. एकंदरीतच प्रशासनाकडून नागरिकांच्या लोक भावनेला दुर्लक्षित करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या वतीने बैठे आंदोलन करण्यात आले, जेणेकरून प्रशासनाकडे लोक भावना पोहोचावे यासाठी पुन्हा एकदा स्मरण पत्र म्हणून निवेदन देण्यात आले आणि सोबतच लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आली.
सदर भाजी मंडई चे काम पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी असणारी स्वच्छतागृहांची कामे, कंपाउंड वॉल ची कामे, भाजी मंडई पासून हनुमान नगरला जोडणारा थेट संलग्न रस्ता, तसेच या रस्त्यात येणारे महावितरण चे विद्युत खांब, आतली लाईट व्यवस्था, समोर पार्किंग साठी लागणारे पट्टे आणि पार्किंग व्यवस्था या सगळ्या गोष्टी सुसज्ज तयार करण्यात याव्यात आणि त्यासोबत समांतर पातळीवर प्रशासनाने या भाजी मंडईला लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला मार्केट हनुमान नगर सांगली असे नामकरण करण्यासाठी प्रशासकीय महासभेत योग्य तो ठराव करावा आणि या ठिकाणी सदर नामकरणाचा फलक लावूनच भाजी मंडई चे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी या बैठे आंदोलनाच्या आणि निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. तसे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले सोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली ही प्रतिमा प्रशासनाला त्यांच्या कर्तव्य भावनेची नक्कीच आठवण करून देईल.
याउपर याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास निश्चितच या प्रभागातील जनभावनेचा अनादर केला असे समजून या ठिकाणी मोठा जन आंदोलनाचा लढाऊ करण्यात येईल हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. अशी माहिती या ठिकाणी या प्रसंगी बोलताना या प्रभागाचे माजी नगरसेवक अभिजीत भोसले यांनी दिली.
मा, नगरसेवक,
अभिजीत भोसले