कोल्हापूर रोड रुंदीकरणाबाबत बैठक संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/08/2025 3:55 PM

गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूर रोड रुंदीकरण थांबलेल्या कामा बाबत मीटिंग संपन्न झाली 

कोल्हापूर रोड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी रखडलेल्या रस्ता कामा बाबत मीटिंग आयोजित करण्यात आली होती 
सदर मीटिंग मध्ये रस्ता काम बंद का पडले आहे 
नेमका रस्ता किती मीटर रुंद आहे 
सदर रस्त्याला सर्विस रस्ता धरला आहे का 
पाण्याच्या पाईपलाईन शिफ्ट करायचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे 
गटारी काम सुधा चुकीच्या पद्धतीने सुरू आहे 
तसेच शास्त्री चौक ते 100 फुटी रस्ता 35 मीटर रुंद आहे नकाशावर आणि प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने अंदाज पत्रक केले आहे आणि चुकीच्या पद्धतीने काम सुरु केले होते त्याबाबत चर्चा करण्यात आली 
तसेच 100 फुटी रोड ते अधिसागर कार्यालय पर्यंत सदर रस्ता 45 मीटर रुंद नकाशावर आहे त्याचे भूमी संपादन प्रक्रिया पार पडली असून त्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे 
तसेच त्या ठिकाणी महापुराचे तसेच आजू बाजूचे सांडपाणी वाहून नेहण्या साठी जागतिक बँकेकडून प्राप्त झालेल्या निधीतून कामाचे टेंडर काढण्यात आले आहे त्यावर सुद्धा लेवल काय आहेत तसेच सर्विस रस्ता सोडून कडेला गटारी करण्याबाबत स्थानिक शेतकरी रहिवासी यांनी सूचना मांडल्या 
पाण्याचे पाईप लाईन चुकीच्या पद्धतीने टाकण्यात येत आहेत त्या बाबत सुधा चर्चा करण्यात आली 
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने अंदाज पत्र तयार केले आहे त्यामुळे सदर रस्ता पूर्ण क्षमतेने होणार नाही 
अशा परिस्थितीत आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची सोमवारी भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, मनपा आयुक्त,यांच्या बरोबर संयुक्त मीटिंग आयोजित करण्यासाठी विनंती करण्याचे ठरले 
व आपल्या सांगली शहरातील मुख्य प्रवेश असलेला रस्ता सुसज्ज असला पाहिजे ह्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे ठरले 
तसेच सदर रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने रस्ता कडील बेकायदेशीर खोकी पुनर्वसन करण्यात बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत,

तसेच अंकली चौकात भव्य स्वागत कमान उभी करण्यात आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी निधी मंजूर करून आणण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे. यावेळी  हणमतराव पवार, सतीश साखळकर,अमर पडळकर, शहाजी भोसले, रज्जाक नाईक, अभिजीत भोसले, कुणाल संकपाळ, युवराज बावडेकर, शरद नलवडे, विनायक कुलकर्णी, सुरज चोपडे, उदय भडेकर, संदीप दळवी, अजिंक्य कांबळे, अमर शेटे, सलीम पन्हाळकर, अमर सम्राट, विवेक पवार, सुरज कांबळे, सागर जाधव, प्रसाद बोळाज, धीरज मोरे, सतीश शिकलगार, शिराज पन्हाळकर, देवेंद्र कांबळे, लहू दादा भडेकर, शैलेश पवार आदी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या