७९ वा स्वातंत्र्य दिन सावरकर स्मारक भगूर येथे उत्साहात साजरा
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात निवृत्त पोलीस अधिकारी श्री. रमेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
यावेळी श्री. रमेश पवार आणि भगूर नगरपालिकेचे माजी उपनगराधक्ष दीपक बलकवडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाचे व्यवस्थापक भूषण कापसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल व सावरकरांचे पुस्तक देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाच्या आयोजनात आकाश नेहरे व खंडू रामगडे यांनी महत्वाची भूमिका बजावली, तर सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले. कार्यक्रमाला मनोज कुवर, अंबादास आडके, प्रशांत कापसे, सुभाष जाधव, गणेश बोराडे, सुभाष पुजारी, विरुशेठ लोया, संतोष मोजाड, सुनिक जोरे, प्रताप गायकवाड, आशिष वाघ, दिगंबर करंजकर, परीक्षित जोशी तसेच असंख्य भगूरकर नागरिक व सावरकरप्रेमी उपस्थित होते.