*तीन महिन्यात सहा बालविवाह रोखण्यात यश*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 15/08/2025 8:55 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)

*बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांचा पुढाकार आवश्यक*
-- *जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 *महिला व बालविकास विभागाकडील विविध विषयांची आढावा बैठक संपन्न*

 सातारा, दि. : मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सहा बालविवाह रोखण्यात आले आहेत. यामध्ये सातारा , कराड तालुक्यातील घटनांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन ठोस कार्यवाही करावी. आपली जबाबदारी पार पाडण्यात जे ग्रामसेवक ग्रामसेवक कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिला व बालविकास विभागाकडील जिल्हा सनियंत्रण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पुनर्वसन समिती, जिल्हास्तरीय कृती दल समितीची बैठक पार पडली . बैठकीसाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मीना बेदरकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्रीमती शिल्पा पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा उद्योग व्यवस्थापक श्री. दंडगव्हाळ, बालकल्याण समिती अध्यक्ष सुचित्रा काटकर, जिल्हा संरक्षण अधिकारी दिपक पाटील, अजय सपकाळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी नितीन इरकर, तुषार सुरत्राण, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, चाईल्ड लाइन् कक्षाचे केंद्र समन्वयक संकेत मोरे आदी उपस्थित हेाते.

 कौटुंबिक हिसांचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंर्तगत येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचा जलद निपटारा करुन पीडीत महिलेला दिलासा द्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, ज्या बालकांना आई किंवा वडील नाहीत किंवा दोन्ही पालक गमावले आहेत अशा सर्व बालकांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात यावे .
अनाथ आश्रमातून बाहेर पडलेल्या मुलांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्याच्या कोणत्याही भागात बालकामगार आढळणार नाहीत यासाठी धाडसत्र मोहिम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 या बैठकीत त्यांनी मनोधर्य योजनेचा आढावा घेतला. अपराधी परीक्षा अधिनियम १९५८, अनैतिक व्यापार प्रतिबंध, महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध, महिला धोरण, महिलांसाठी विविध विभागाच्या वैयक्तिक , सामुहिक योजनांचा आढावा घेतला. जिल्हा बालसंरक्षण कक्षाचा व बालकल्याण समितीचा, चाईल्ड हेल्पलाईन कक्ष व बालविवाह प्रतिबंध कायद्याची अमंलबजावणी या बाबत आढावा घेतला . जिल्हाधिकारी यांच्या हस्ते १०९८ या हेल्पलाईन माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या