रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता - अजितदादा द्या आदेश, हे फक्त तुम्हीच करू शकता

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2025 6:55 PM

 *सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था लोकांचे प्राण घेऊ लागली आहे. सांगली प्रशासनाच्या कृपेने चांगल्या रस्त्यावर पुन्हा एकदा डांबरीकरण केले जात आहे. मात्र खराब झालेल्या रस्त्यांकडे कोणाचेही लक्ष नाही.दुर्लक्ष होत आहे.*
       *महापालिका क्षेत्रातील असे अनेक रस्ते आहेत ज्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. यामध्ये सांगली स्टॅन्ड ते कोल्हापूर रस्ता, लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रोड तसेच इतर अनेक रस्त्यांचा समावेश आहे. सांगली मिरज रोड अत्यंत चांगल्या दर्जाचा असतानाही यावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. याकडे अजित दादा तुम्ही जरा गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. उद्या तुमचा सांगली दौरा आहे. तुम्ही जर कोल्हापूर रोड वरून सांगलीत आलात तर तुमच्या लक्षात येईल. तुमची हाडं खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाहीत.*
         *दादा! तुमच्या राज्यात या प्रशासनातील अधिकारी महापालिका असो अथवा सार्वजनिक बांधकाम विभागातील असोत यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. हम करे सो कायदा  अशी इथल्या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. या मुजोर अधिकाऱ्यांची कान उघडणी आपल्यासारख्या नेत्याकडून होणे गरजेचे आहे. असे आम्हास वाटते. त्यामुळे आपण या रस्त्यांची थोडी माहिती घ्यावी. आणि संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांच्या बाबतीत कडक पावले उचलावीत अशी आमची समस्त सांगलीकरांची मागणी आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी मोकाट कुत्र्यांनी शाळकरी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना ताज्या आहेत. शिवाय रस्त्याकडे या केले जाणाऱ्या अतिक्रमणांमुळे विद्यालय तरुणीचाही बस खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. हे केवळ आणि केवळ प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच होत आहे.*
       *दादा! सांगलीकर जनता खूप हाल सोसत आहे वो! रस्त्यावरील खड्डे असो,गटारांची साफसफाई असो, मोकाट कुत्र्यांकडून केले जाणारे हल्ले असो, स्वच्छ पाणीपुरवठा असो, रस्त्याकडेला केले जाणारे अतिक्रमण असो या साऱ्या पातळ्यांवर सांगलीतील प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे या झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्याचे काम आपल्यासारखा खंबीर नेताच करू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे. ते तुम्ही करावे अशी आमची मनापासूनची मागणी आहे. या साऱ्या गोष्टींबाबत चौकशीचे आदेश द्या. दादा! हे फक्त तुम्हीच करू शकता...*

 *मनोज भिसे-अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या