मनपा क्षेत्रात नागरी प्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/08/2025 7:50 PM

प्रति,
मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील
पालकमंत्री, सांगली जिल्हा

विषय : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, सार्वजनिक सोयी व सुरक्षेसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याबाबत...

महोदय,
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना दररोज अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असून त्यावर त्वरित लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.



1. रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न :

सांगली स्टॅन्ड ते कोल्हापूर रस्ता, लक्ष्मी मंदिर ते कुपवाड रोड यांसह अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत.

विशेष म्हणजे, सांगली-मिरज रोड अत्यंत चांगल्या दर्जाचा असतानाही अनावश्यकपणे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी.



2. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न :

अलीकडील काळात मोकाट कुत्र्यांनी शाळकरी मुलांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करून जीवितास धोका निर्माण केला आहे. याबाबत तातडीने शास्त्रशुद्ध उपाययोजना करण्यात याव्यात.



3. अतिक्रमणाचा प्रश्न :

रस्त्याकडेला होत असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अतिक्रमणामुळे विद्यालय तरुणीचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावर तातडीने कठोर पावले उचलावीत.



4. पाणीपुरवठा व स्वच्छता :

नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळावा तसेच गटारांची नियमित साफसफाई होण्यासाठी जबाबदार विभागावर देखरेख ठेवावी.



5. स्ट्रीट लाईट बसवणाऱ्या कंपनीची चौकशी :

महानगरपालिका क्षेत्रात समुद्रा कंपनीमार्फत बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित अनियमितता दूर करण्यात याव्यात.



6. महत्त्वाच्या कामांची चौकशी :

चिंतामणी नगर पुलाच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी.

सांगली-मिरज रोडवरील रस्त्याच्या कामाची सुद्धा चौकशी करून नागरिकांसमोर अहवाल सादर करावा.
आमची मागणी :
वरील सर्व प्रश्न गंभीर आहेत. म्हणून माननीय पालकमंत्री महोदयांनी याबाबत तातडीने संबंधित विभागांना आदेश द्यावेत, दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि नागरिकांना मूलभूत सुविधा व सुरक्षितता मिळावी ही आमची नम्र विनंती आहे. यावेळी लोकहित मंचाचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील उपस्थित होते. 

आपला विश्वासू,
मनोज भिसे 
अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या