नवमहाराष्ट शिक्षण संस्था व अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2025 11:10 AM

     नव महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड संस्थेच्या  सौ. आशालता आ. उपाध्ये गर्ल्स हाय व उच्च, माध्यमिक विद्यालय, न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी स्कूल, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, लाल बहादुर बालमंदीर कुपवाड यांचे संयुक्त विद्यमाने भारताचा 79 वा  स्वातंत्र्यदिन प्रसिध्द उद्योजक  विजय सवदी, जय रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. मिरज, उद्योजिका अर्चना पवार, मास इंजिनिअरींग प्रा. लि. सांगली,  स्वप्नाली माने, कक्ष अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जि. प. सांगली  यांचे हस्ते ध्वजारोहणाने व भारत माता प्रतिमेच्या पूजनाने संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद्ननंतर संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी संचलन, मानवंदना, मार्च पास, रायफल डेमो, देशभक्तीपर गीते व नृत्य, ढोलताशे पथक, विद्यार्थी मनोगते, या प्रात्यक्षिकांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
          प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती, इ. 10 वी व 12 वी, TSE, NMMS व इतर स्पर्धापरीक्षेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थी – विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करणेत आला. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या ॲस्ट्रोनॉमी ॲण्ड स्पेस लॅब (जिओग्रॉफी लॅब), मिनी सायन्स सेंटर, ॲक्टिव्हीटी लॅब, संगणक लॅब तसेच एम. सी. एफ प्रशिक्षणास भेट दिली व या शाळेमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक सुविधा बद्दल शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली, चर्चा केली व त्याबद्दल  समाधान व्यक्त केले. 
           यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सेक्रेटरी रितेश शेठ, अभिजित शेटे, बादल उपाध्ये, बाळासाहेब कोथळे, कांचन उपाध्ये, डॉ. पूनम उपाध्ये, कोमल उपाध्ये, महावीर बिरनाळे, मौलाली शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक, सर्व विभागातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिया पाटील यांनी तर आभार शिरीष चिरमे यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या