आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
*दहिवडी कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा संपन्न*
दहिवडी दि:क्षणिक सुखाचा आनंद घेण्यासाठी छोट्या मोठ्या व्यसनांना सामोरे जाऊन स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करू नका असे मत, दहिवडी पोलीस स्टेशन व दहिवडी कॉलेजच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.विष्णू मस्के , उपप्राचार्य डॉ मीरा देठे , प्रा अमर जाधव ,प्रा मारुती ढाणे,प्रा. इंद्रजीत ऐवळे, प्रा किरण पवार पोलीस दलातील श्री रामचंद्र गाढवे ,श्री सुहास गाडे , श्री विजय खाडे उपस्थित होते.
सध्याच्या गतिमान युगामध्ये विद्यार्थ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्रामच्या युगात चंगळवादाला प्राधान्य देऊन अप्पू, चरस, गांजा, घुटका, दारू या अन अशा बऱ्याच प्रकारच्या व्यसनांना सामोरे जाऊ नये कारण आयुष्य हे क्षणभंगुर असून एखाद्या साध्या सहजचुकीनेही ते उध्वस्त होऊ शकते आणि म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि स्वतःला आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करावे. व्यसनमुक्ती या विषयावरती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर निबंध स्पर्धेमध्ये 50 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुवर्णा कोळी, सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जाधव, आभार प्रदर्शन प्रा.विजयकुमार पवार यांनी केले.