आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने सर्वानी उपस्थित रहावे, कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांचे आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/08/2025 10:34 AM

आज होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा आयोजित मेळाव्यास राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रवादीवर तसेच अजितदादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन- कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी केले आहे

               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार हे आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 
              राज्यात महायुतीचे सरकार स्थापना झाल्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमासाठी मा.अजितदादा पवार हे पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात मेळाव्या करिता उपस्थित राहत आहेत. हा मेळावा सांगली मिरज रोडवरील संजय भोकरे महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी तीन वाजता होणार आहे.
             या मेळाव्या करिता आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध सेलचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
           तरी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्या करिता जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू व भगिनींनी मेळावा करिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या