प्रशासकीय बेबंदशाहीला लगाम घालण्याची गरज अन्यथा महाराष्टाचे वाटोळे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/08/2025 8:55 PM

दोन दिवस झाले एका तहसीलदाराने खुर्चीवर बसून गाणं गायला म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ज्याने ही कारवाई केलेली आहे त्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठाचे कौतुक करायचे का सत्कार करायचा याचा विचार मनात घोळत आहे...
कारण अखंड महाराष्ट्रामध्ये ह्या प्रशासकीय बेबंध शाहीने हजारो कोटींची माया गोळा केली आहे या खुर्चीवर बसून लाखो रुपये लाच स्वरूपात गोळा करत आहेत परवा पवार नामक एक जिल्हाधिकारी सापडले त्यांच्या कडची मालमत्ता ऐकली तर चक्कर येऊन पडायची पाळी आहे त्याबाबत कारवाई करताना वरिष्ठ अधिकारी किंवा राज्यकर्ते दिसत नाही.
काय कारण असावे त्यांची वाटणी असावी का त्यांच्या आदेशानेच सदर माया गोळा केली जात असेल
अशा लाचखोर अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई झालेली ऐकवत नाही मात्र गाणं म्हटलं म्हणून निलंबन करून काय साध्य केले आहे हा खरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अशा बेबंध प्रशासकीय शाहीला लगाम घालावा अन्यथा महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही 

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या